शेळगाव बॅरेजमधून यावल शहरास पाणीपुरवठा करण्याला शासनाची मंजूरी; अमोल जावळे यांचा पाठपुरावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरात अनेक वर्षांपासून पाण्यांची समस्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यावल शहरात पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी यावलकरांना मोठी कसरत करावी लागते. समस्येला दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून आणि भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे यावल शहरास शेळगाव बॅरेज येथून पिण्याचे पाणी उचलण्यास मान्यता मिळाली आहे.

शेळगाव बॅरेजच्या माध्यमातून सुमारे ५५ हजार लोकसंख्या असलेल्या यावल शहराला पिण्याचे पाणी मिळणार असून शहराला कायम भेडसावणाऱ्या पाणीच्या प्रश्नचे आता कायम संपणार आहे. महाराष्ट्र शासनाने शेळगाव बॅरेजच्या माध्यमातून पिण्याचे पाणी यावल शहरास उपलब्ध करून देण्यात मंजूरी दिली आहे. यावल शहरास शेळगाव बॅरेजमधून २.८२ दश लक्ष पाणी मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नामुळे आणि अमोल हरिभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाने यावल शहरास शेळगाव बॅरेजचे पाणी मिळेल त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची संपूर्ण शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

Protected Content