Home Cities जळगाव जाणून घ्या ! लखपती दीदी योजनेची संपूर्ण माहिती

जाणून घ्या ! लखपती दीदी योजनेची संपूर्ण माहिती


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येत आहे. आता महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक नवी योजना सुरू केली आहे. शासनाने लखपती दीदी ही नवीन योजना सुरू केलेली आहे. दीड लाख रुपये पर्यंत जे बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लखपती दीदी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ३ कोटी महिलांना स्वयंरोजगार चालू करण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिना व्याजी आर्थिक मदत केली जात आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते. यामध्ये एलईडी बल्ब तयार करणे, प्लुम्बिंग ची कामे तसेच ड्रोन रिपेअरिंग इ. टेक्निकल कामे शिकवली जाणार आहेत.

ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.


Protected Content

Play sound