पीएम रिलीफ फंडातून कर्करोग पीडीताला आर्थिक मदत; मंत्री रक्षाताई खडसेंचा पाठपुरावा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील मो.आसिफ मो. ताहीर यांना कर्करोगाच्या उपचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे यांनी २.५ लाख रुपये पीएम रीलीफ फंडातून त्वरित मंजुर करून दिली.


अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत असणारे मो. आसिफ यांना कर्करोगाने पछाडले असता त्यांना कुठूनही मदत मिळाली नाही त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओच्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे यांना सांगितले. रक्षाताई खडसे यांनी तात्काळ पीएमओ कार्यालयाशी संपर्क साधून पीएम रीलीफ फंडातून त्वरित २.५ लाख रुपये मिळवून दिले. ताईंचे स्विय सहाय्यक तुषार राणे, कार्यालयीन व्यवस्थापक गणेश कोळी यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता केली. त्याबद्दल मो. आसिफ मो. ताहीर यांच्या कुटुंबाने खासदार रक्षाताई खडसे, तुषार राणे, गणेश कोळी व सारीका चव्हाण यांचे आभार मानले.

 

Protected Content