धक्कादायक : अल्पवयीन मुलीला जबरदस्ती शेतात नेवून केला अत्याचार

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती दुचाकीवर बसवून गावातील शाळेच्या शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या गावात राहणारा सौरव महेंद्र पाटील याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून तिला मक्याच्या शेतात नेवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता समोर आला आहे. तसेच अत्याचार केल्याचे कुणाला सांगितले तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी पिडीत मुलीसह चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सौरव महेंद्र पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहे.

Protected Content