भुसावळ येथे बदलापूर घटनेच्या निषेर्धात मविआचे मूक आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | भुसावल शहर कॉग्रेस कमेटी व शिवसेनेच्यातर्फे महात्मा गांधी पुतळयाजवळ बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेर्धात मूक आंदोलन करण्यात आले. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत मविआच्या नेत्यांनी काळी फित लावून घटनेचा निषेध केला. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत मूक आन्दोलन करण्यात आले.

याप्रसंगी शहर अध्यक्ष रवींद्र निकम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागचे प्रदेश उपाध्यक्ष मुनव्वर खान, शिवसेना तालुका अध्यक्ष दीपक धांडे, दिलीप सुरवाडे, प्रदेश सचिव युवक कांग्रेस इम्रान खान, सलीम गवली, महेबुब खान, संतोष साल्वे, संजय खडसे, भगवान मेढे, राम अवतार परदेशी,राजु डोगरे, शैलेन्द्र नन्नवरे, हमीद शेख, सन्यान शिव, अनवर तडवी, असगर भाई, हमीदा फातेमा तडवी, विकास खडके, कुराचे सरपंच प्रमोद ऊमरकर, सुधाकर बडगुजर व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content