भाजपला धक्का; मंत्र्याच्या पुतण्याने घेतली शरद पवारांची भेट

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवीन मोठी खेळी केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत याचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचा कारभार पाहतात. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असणाऱ्या मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ शुगरमुळे पंढरपूर मतदार संघात सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अशातच सावंत यांनी आता थेट विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. पंढरपूरचे विद्यमान आमदार भाजपचे असल्याने महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळणे अशक्य आहे. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघावर नुकताच दावा केला. यानंतर आता अनिल सावंत हे पंढरपूर मतदार संघावर दावा करत आहेत. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फायदा तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो.

Protected Content