रस्त्यावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू तर मुलगा किरकोळ जखमी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मुंजलवाडी-पाल रस्त्याने अचानक झाड पडून एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चेतन सोळंकी आणि त्यांचे वडील बुढा सोळंकी हे पाल रस्त्याने मुंजलवाडी गावाजवळ पावसापासून संरक्षणासाठी एका झाडाखाली उभे होते. यावेळी अचानक झाड पडल्याने बुढा सोळंकी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा चेतन सोळंकी किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने तातडीने जखमी चेतन सोळंकी यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोळंकी कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिक त्यांना धीर देण्यासाठी पुढे सरसावले आहे.

Protected Content