विक्रोळीत कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई मध्ये विक्रोळी भागात पूर्व द्रुतगती मार्गावर एक मोठा अपघात झाला आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फूटपाथवरील झाडाला आदळली आणि काही अंतरावर जाऊन पलटली असल्याचं समोर आले आहे. दरम्यान यामध्ये 2 जण ठार झाले असून या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

विक्रोळी हाय वे वर हॉटेल प्रविण समोर रात्री 12.30च्या सुमारास हा कार अपघात झाला आहे. यामध्ये चालक सिद्धार्थ ढगे आणि त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र रोहित निकम गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. त्यांना राजावाडी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र तो पर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Protected Content