समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत ?; कोलकाता व बदलापूर प्रकरणावर राहूल गांधींची पोस्ट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे. अशात राहुल गांधीं यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर, चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यावरून सार्‍याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना राहुल गांधी यांनी देखील एक्सवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एफआयआर दाखल न होणे ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे.

 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हे लपविण्याचे अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक ठरत आहेत. एफआयआर न नोंदवल्याने पीडितांची निराशा तर होतेच पण गुन्हेगारांना देखील धीरही मिळतो, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नसल्याचेही खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Protected Content