धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू; नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाम नगरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवारानं एकच आक्रोश दिसून आले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आर्यकिर्ती उर्फ बबलू चंद्रकांत सोनवणे वय २६ रा. श्याम नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील श्याम नगरात बबलू सोनवणे हा आपल्या वडील व भावांसाबत वास्तव्याला होता. शहरातील विजय कलेक्शन येथे कामाला होता. शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळातच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यावेळी नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच आक्रोश केला होता. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content