जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित मागण्यांवर अनेकवेळा चर्चा करून सुध्दा मार्ग निघत नसल्यामुळे एनमुक्टो ने आंदोलन सुरू केले आहे त्याचा एक महत्वाचा भाग म्हणून एनमुक्टो संघटने कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे हजारोच्या संख्येने संघटित होऊन मोर्चा काढला व मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात जुनी पेन्शन योजना, पीएच.डी.वेतनवाढ, कॅस अतंर्गत पदोन्नती देण्यात झालेले विलंब, एकूण रिक्त पदांच्या ९० % भरती करण्याचा कायदा असताना शासनाच्या संवेदनशील धोरणामुळे मुद्दाम रखडलेली पद भरती प्रक्रिया, घड्याळी तासिकांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना कायम नियुक्ती द्यावी, अश्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. शासनाच्या वतीने कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून प्रो.व्हीसी.डॉ.एस.टी. इंगळे यांनी निवेदन स्वीकारले व प्राध्यापकांच्या मागण्या रास्त आहेत त्या शासनदरबारी निश्चितच पोहोचविले जातील असे आश्वासन दिले.
प्रसंगी एम्फुक्टो चे पदाधिकारी डॉ. संजय सोनवणे यांनी “एनमुक्टो” ही अखिल भारतीय स्तरावर व्यापक जनाधार असलेली सर्वात मोठी बुद्धिजीवी प्राध्यापकांची संघटना एआयफुक्टो व महाराष्ट्रात एमफुक्टो सी संलग्नित संघटना आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणांवर वर्षानुवर्ष ही संघटना आवाज उठवत आहे. आतापर्यंतचे सर्व वेतन आयोग आणि पदोन्नती तसेच, पद मन्यतेपासून ते पदस्थापने पर्यंत अनेक बाबींवर संघटनेचे बारीक लक्ष असते, संघटनेत अभ्यासू लोकांची परंपरा आहे म्हणून सतत शासनाच्या अन्यायावर बोट ठेवून दिशा दाखवायचे काम संघटना करत आलेली आहे असे सांगितले.
माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले की एन्मुक्टो संघटना कोणतेही राजकीय पक्ष किंवा राजकीय विचारांच्या बाजूने न झुकता फक्त प्राध्यापकांचे हित या एकमेव उद्देशाने संघटना काम करत आलेली आहे त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी ती मोजण्याची आमची तयारी आहे असे परखडपने मत मांडले. एमफुक्टो चे पदाधिकारी प्रा.ई.जी.नेहते यांनी शासनाने वेळेवर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर भविष्यात सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल असे घोषित केले.
केंद्रीय सहसचिव डॉ.विजय सोनजे यांनी संघटनेची ताकद काय हे यापूर्व नेत्यांनी सिध्द केले आहे जुन्या नेत्यांनी आयुष्य पणाला लावलेल्यामुळेच आज अनेक लाभ मिळात आहेत, येणारा काळ खूप संघर्षाचा आहे नवीन पिढीने तेवढ्याच ताकदीने स्वताला सज्ज केले पाहिजे असे असे आवाहन केले. केंद्रीय अध्यक्ष नितीन बाविस्कर यांनी नियोजित आंदोलनाचे सर्व टप्पे आपण यशस्वी करून दाखवू असा विश्र्वास दिला प्रसंगी सीएचबी प्राध्यापकांचे प्रतिनिधींनी म्हणून प्रा.ईश्वर, प्रा.गुट्टे यांनी आपल्या व्यथा मांडल्या, या पदाधिकाऱ्यां सोबतच केंद्रीय कार्यकारिणी चे सचिव बी. टी. पाटील, केंद्रिय सहसचिव विजय सोनजे, नंदूरबार जिल्हा अध्यक्ष महेश गांगुर्डे, डॉ.दिनेश पाटील, सचिव डॉ. ए.डी.गोस्वामी व डॉ. महेंद्र रघुवंशी, डॉ. पी. डी.पाटील, डॉ.संदीप नेरकर, प्रा.सुरेखा पालवे, प्रा अधिकार बोरसे, डॉ.निकम आणि इतर मान्यवरांनी नियोजन केले व मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेत फूट पडणाऱ्या लोकांपासून दूर राहा असा संकल्प करत अश्या प्रवृत्तींचा निषेध केला व मोठ्या जल्होषात एन.मुक्टो जिंदाबादचा नारा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी सर्व जिल्हा व केंद्रीय कार्यकारिणी चे आजी माझी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सीएचबी प्राध्यापकांनी एकसंघ राहून मोर्चात सहभाग घेतला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व शखाचे सदस्य व कार्यकारणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.मोर्चा त जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्हा तील विविध महाविद्यालयतील बहुसंख्य प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.