विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विषारी औषध घेतलेल्या जवखेडा खुर्द गावातील तरूणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धनराज भिमा सोनवणे वय ३८ रा.जवखेडा खुर्द ता.एरंडोल असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील जवखेडा खुर्द गावात धनराज सोनवणे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता तो शेतात काम करत असतांना त्यांनी विषारी औषण सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनीवारी सकाळी १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Protected Content