बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करत आहे राज्यातील महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा असं आवहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीयमंत्री पदावर जाधव यांनी केले.
बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल आणि जळगाव जामोद येथे महायुतीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे भाजपाचे जिल्हाप्रमुख सचिन देशमुख राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्याबद्दल केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना महिलांनी राखी बांधुन कृतज्ञाता व्यक्त केली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की ‘गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी राज्यात महायुती सरकारने काम केले आहे. त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येणार आहे त्यासाठी आपणा सर्वांना एक दिलाने काम करायचे आहे. केंद्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी होणाऱ्या विधानसभेत पुन्हा महायुतीच्या घटक पक्षांचे उमेदवार निवडून द्यायचे आहे केंद्र सरकारच्या विविध तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा अस आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हयातील जळगाव जामोद आणि सोनाळा या नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु होणार आहे भविष्यात ही रेल्वे लाईन जलंब ते जळगाव जामोद ही रेल्वे जोडून उत्तर मध्य रेल्वे मार्ग जोडण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीने केल्या जाणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले राज्यातील महायुतीचं सरकार सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकास काम करत आहे
गेल्या पंधरा वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर आणि गोरगरिबांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे त्या योजनेचा लाभ ही सर्वसामान्यपर्यंत पोहचवा असे ते म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून अन्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने कामाला लागा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.