मोठी बातमी ! मनोज जरांगे यांच्यासोबत तिसरी आघाडी स्थापन करणार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीबाबत आपला निर्णय जाहीर करणार आहेत. मात्र त्या आधीच त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आपली आणि मनोज जरांगे पाटील यांची अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, या संदर्भात आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तिसरी आघाडी करणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

समाजामध्ये काम करत असताना मनोज जरांगे पाटील यांचे उद्दिष्ट आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करणार असल्याचा देखील विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content