लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लातूर शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील दहा ते बारा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. जालिंदर मुळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जालिंदर हा भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेला होता, त्यादरम्यान या जेसीबी चालकाने त्याच्यावर जेसीबी चढवला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी जेसीबीचा पाठलाग करत जेसीबी चालकाला धरून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांचे रुग्णालयात उपचार सुरू आहे