यावल तालुक्यात प्रतिबंधीत गुटख्यांची सर्रास विक्री

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने कमी पण राजकीय मंडळी व पत्रकार बांधावांच्या मदतीने विविध ठिकाणी गुटका माफिया विरूद्ध कारवाई सत्र सुरू असतांना मात्र दुसरीकडे यावल तालुक्यात यावल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या दोन राज्यातुन तस्करीतुन आयात करून विक्री करण्यात येत आहे.

शेजारच्या गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यातुन येणाऱ्या व न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी गुटका मौखिक आरोग्यास गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल पानमसाला गुटक्याची सर्रासपणे यावल तालुका व शहरातील बसस्थानक परिसर,शाळा विद्यालया अशा विविध सार्वजनिक ठीकाणी परिसरातील पान टपऱ्यापासुन तर अगदी गल्लीबोळातील किराणा दुकान असो सर्वत्र लाखो रुपयांच्या पानमसाला गुटक्याच्या पुडयांची विक्रीला जात आहे.

नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत व अत्यंत धोकादायक असा या गुटखा विक्रीच्या विषयाकडे संबधीत अन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत असल्याची नागरीकांची ओरड आहे . या मानवी जीवनास धोकादायक अशा गुटख्यांची विक्री करणाऱ्या व न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आर्थिक स्वार्थासाठी गुटका विक्री करणाऱ्यांवर मोठी कार्यवाही करीत कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी अनेक पालक व सुज्ञ नागरीकांकडून करण्यात येत आहे. या गुटखा विकीवर कारवाही कोण व कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

यावल ,चोपडा आणी रावेर हे तिघ तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असुन सिमा रेषेवर गुजरात आणी मध्यप्रदेश अशी दोन राज्य तालुक्यास लागून असल्याने या दोघ राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटका या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटी व्दारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्र वाहतुक करून यावल तालुक्यातील काही गुटका माफिया कड्डन करण्यात येत असून नंतर एका गोदामात या गुटक्याची साठवन करून तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे.

शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानीकारक पानमसाला गुटख्याची एका महिन्यास सुमारे ५०ते ६०लाखाची विक्री करण्यात येत आहे. या बाबतची माहीती संबधीत अन्न व प्रशासन विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला जात असुन मात्र यावल तालुक्यात प्रशासनाकडुन या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याने योग्य अशी कारवाई होत नसल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Protected Content