जळगावचा राजा श्री गणेशाचे पाटपूजन सोहळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे भगवा चौकात रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता जळगावच्या राजाचे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांच्या उत्साहात लक्षवेधी अशा ढोल पथकाचे सादरीकरण झाले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहरू चौक मित्र मंडळतर्फे रविवारी जळगावचा राजा श्री गणपती यांचा पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदा द्वारका येथील भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. धीरज व रुचिता अग्रवाल या दंपत्याच्या हस्ते पाटपूजन पवित्र मंत्रघोषात पार पडले. याच फाटावर श्री गणेश विराजमान होणार आहे. पाटपूजन नंतर श्री गणपतीची महाआरती झाली.

प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी हे उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर आकर्षक असे शिवगंध संस्थेच्या ढोल पथकाचे सादरीकरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रसंगी भाविकांनी ढोल ताशांच्या ठेक्यावर जल्लोष केला. यावेळी नेहरू चौक रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती दिली होती. कार्यक्रमासाठी नेहरू चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content