Home Cities जामनेर अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून शालेय साहित्याचे वाटप

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून शालेय साहित्याचे वाटप


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अजित दादा पवार व अरविंद चितोडिया यांच्या दोघांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांनी जामनेर तालुक्यातील खडकी, बोरगाव, नवीदाभाडी, नागणचौकी व शंकरपुरा येथे शालेय साहित्य वह्या वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद भाऊ चितोडिया व त्यांचे सहकारी सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष अरविंद तायडे ,ओबीसी तालुका अध्यक्ष दत्तात्रय नेरकर, विद्यार्थी तालुका अध्यक्ष आदित्य अनिल गायकवाड, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष पराग नेरकर, पंडित नाईक, आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष गजानन कोळी व खडकी ग्रामपंचायत सदस्य उमेश नाईक व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.

 

 


Protected Content

Play sound