ऑनलाईन पेमेंट प्रणालीत बदल होणार

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑनलाइन पेमेंट पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित करता यावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयनं एक नवीन प्लॅन तयार केला आहे. मात्र, त्याचा थेट परिणाम ऑनलाइन पेमेंट युजर्सवर होणार आहे. सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी ४ किंवा ६ अंकी पिन पासवर्ड टाकावा लागतो, पण आता त्यात बदल होणार आहे. येत्या तीन महिन्यात बायोमेट्रिक युपीआय पेमेंट करणे शक्य होणार आहे.

एनपीसीआय यूपीआय-आधारित ऑनलाइन पेमेंटला पिन पासवर्डऐवजी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी काही स्टार्टअप्सशी चर्चा करत आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही ओटीपी आणि कार्ड व्यवहारांसाठी बँकांना नवे पर्याय शोधण्यास सांगितले होतं. आजच्या काळात कार्ड पेमेंट करण्यासाठी मोबाईल ओटीपीची गरज असते. तसंच यूपीआय पेमेंटसाठी पिन पासवर्ड आवश्यक असतात. परंतु नवीन बदलांमुळे युजर्स फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकतील. आयफोन डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी फेस स्कॅन करावे लागते त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करता येईल.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, पिन पासवर्डमुळे अनेक ऑनलाइन फ्रॉड होत आहेत. अशा त-हेने रिझर्व्ह बँकेला ऑनलाइन पेमेंटची चिंता सतावत आहे. यामुळेच आरबीआयने बँकांना इतर पर्याय शोधण्यास सांगितले. पिन बेस्ड मोबाइल पेमेंट करून ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रिपोर्टनुसार, एनपीसीआयकडून येत्या ३ महिन्यांत बायोमेट्रिक आधारित यूपीआय पेमेंट सुरू केले जाऊ शकते. त्यासाठी एनपीसीआयकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

Protected Content