तापी नदी पात्रात अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

 भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहराजवळील असलेल्या तापी नदीत अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

भुसावळ शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहराजवळील तापी नदी पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा मृतदेहाचा भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटवण्याबाबत कोणतेही कागदपत्र अथवा वस्तू मिळाले नाही. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटवावी अशी आवाहन भुसावळ शहर पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे हे करीत आहे.

Protected Content