Home राजकीय विधानसभा निवडणुकीबाबत चेन्निथलांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक

विधानसभा निवडणुकीबाबत चेन्निथलांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी आता सक्रिय झाली आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा होणार असून या चर्चेत तीनही प्रमुख पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र त्या पूर्वी रविवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली.

आज मुंबईतील हॉटेल लीलामध्ये मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते आहेत.


Protected Content

Play sound