Home Cities भडगाव भडगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

भडगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l भडगाव शहरात दरवर्षीप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संत सावता महाराज मंगल कार्यालय येथे आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मंगल कार्यालय ते रथ मार्गे फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर वरून प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

मिरवणुकी नंतर कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भडगाव तहसीलदार विजय बनसोडे तर प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सावित्री बाई फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन विजय महाजन,माळी समाज अध्यक्ष मुकुंदा महाजन, महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन, माजी नगरसेविका वैशाली महाजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी समाजातील दहावी, बारावी, पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

यावेळी गणेश परदेशी, जगन भोई, डॉ.प्रमोद पाटील, डि. डी.पाटील सर, सौ. योजना पाटील, रविंद्र अहिरे, पत्रकार अशोक परदेशी, सुभाष पाटील, महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेचे मा.अध्यक्ष भिकन महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन,संतोष महाजन, विनोद महाजन, आप्पा महाजन,अँड विजय महाजन, शुभम महाजन, विरभान महाजन,दत्तात्रय महाजन , राहुल महाजन,गणेश माळी, विनोद महाजन, मनोज महाजन,पत्रकार सागर महाजन, नितीन महाजन, पत्रकार चेतन महाजन, देविदास महाजन, सामाजिक कार्यकर्ते राम गोपाल सैनी आदींसह माळी समाज पंच मंडळ, महात्मा फुले बहुद्देशीय संस्था, क्रांतीसुर्य युवा मंच चे सर्व सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण महाजन सर यांनी तर आभार गोकुळ महाजन यांनी मानले.


Protected Content

Play sound