कोथळी संत मुक्ताई मंदीर व शिरसाळा हनुमान मंदीरासाठी ६ कोटीच्या निधीला मंजूरी !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील धार्मिक तीर्थक्षेत्र असलेले संतमुक्ताई मूळ मंदिर कोथळी व शिरसाळा हनुमान मंदिर या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा असून शासन दरबारी आ.चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने दोघे मंदिरांसाठी ६ कोटी रुपयाचा भरून निधी मंजूर करण्यात आला आहे..

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२४-२५ अंतर्गत विकास महामंडळाशी संबंधित विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक : टीडीएस 2024/06/प्र. क्र.120/पर्यटन-1 हा शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2024 रोजी झालेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी सतत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी येथील पर्यटन क्षेत्र विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर परिसर पर्यटन क्षेत्र विकास करणे कामी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये आमदार पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघातील दोघी मंदिरांसाठी एकूण 6 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे मतदार संघातील भाविक व वारकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंत्री व आमदारांनी दिलेला शब्द पाळला
संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थान होते त्या दिवशी मंत्री गिरीष महाजन , आ.चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी लवकरच निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता, विशेष म्हणजे पालखी स्वगृही येण्याच्या आत सुमारे 5 रुपये कोटी निधी मंजूर करून मंत्री व आमदारांनी शब्द पाळल्याने , संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई कोथळी मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज तसेच असंख्य वारकरी बांधवांतर्फे आभार मानण्यात येत आहेत.

संत मुक्ताई मंदिर परिसरात ही होणार कामे –
१) आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ मूळ मंदिर (कोथळी) मुक्ताईनगर या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत मुक्ताई जीवन चरित्र भीतीचित्र डिजिटल स्वरूपात साकारणार !
२) भव्य प्रवेशद्वार
३) दोन मजली भक्त निवास व
४) सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

Protected Content