Home क्राईम जळगावात ईलेक्ट्रीक बाईकने घेतला पेट

जळगावात ईलेक्ट्रीक बाईकने घेतला पेट


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ख्वाजामिया दर्गा परिसरातील लुंकड कन्या शाळेजवळ एका महाविद्यालयीन तरुणाच्या दुचाकीने गुरुवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अचानक पेट घेतल्यामुळे नागरिकांची काही वेळेस धावपळ उडाली होती. सदर तरुणांनी तात्काळ गाडी थांबवून बाजूला झाल्यामुळे त्याला काही इजा झाली नाही. दरम्यान काही नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलावल्यानंतर त्यांनी आग विझवली.

याबाबत अधिक माहिती अशी कीृ सक्षम नितीन सोनवणे (वय १७) हा महाविद्यालयीन तरुण गुरुवारी १ ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ख्वाजामिया दर्गा परिसरातील लुंकड कन्या शाळाकडून जात होता. त्यावेळेला त्याला इंजिन गरम झाल्याचे लक्षात आले. त्याने दुचाकी बाजूला लावली. मात्र त्याच वेळेला त्याच्या दुचाकीने पेट घेतला. या वेळेला अग्निशमन दलाला बोलावल्यानंतर त्यांनी तात्काळ येऊन आग विझवली. मात्र आगीत दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले. या वेळेला नागरिकांनी गर्दी केली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी नासिर अली, गिरीश खडके, भारत बारी, रविंद्र बोरसे यांनी प्रयत्न केले.


Protected Content

Play sound