Home धर्म-समाज फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये वृक्षारोपण

फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये वृक्षारोपण

0
36
school trees
school trees

school trees

फैजपूर प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल हायस्कुलच्या प्रांगणात आज (दि. 2 जूलै) रोजी पालिकेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. या पुढील काळ हा वृक्षांवर अवलंबून राहणार असून, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात एक वृक्ष लावून त्याची संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे नगराध्यक्ष महानंदा होले यांनी आज शहरातील म्युनिसिपल हायस्कुलच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष रशीद तडवी, भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी, कलीम मण्यार, प्रभाकर सपकाळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, रवींद्र होले, रईस मोमीन, मुख्याध्यापक आर.एल. आगळे, पर्यवेक्षक संजय सराफ यासह शाळेतील शिक्षक शिक्षतेकतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Protected Content

Play sound