Home राष्ट्रीय १२वीचा निकाल ९वी,१०वी व ११वीचे गुणांवर ठरणार

१२वीचा निकाल ९वी,१०वी व ११वीचे गुणांवर ठरणार

0
65


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येत्या काही दिवसात १२ वीच्या निकालात ९ वी, १० वी आणि ११ वीचे गुण देखील महत्वाची भूमीका बजावू शकतात. एनसीईआरटीचे युनिट पारखने तयार केलेल्या एका रिपोर्टमध्ये यांसंबधीची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये ९ वी, १० वी आणि ११ वीचे गुण हे १२ वीच्या निकालामध्ये देण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे, तसेच याच आधारावर १२ वीचा निकाल तयार केला जावा असेही सुचवण्यात आले आहे.

एका रिपोर्टनुसार, शिक्षण मंत्रालयाला ही रिपोर्ट सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये ९, १० आणि ११ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर १२ वीचा निकाल तयार केला पाहिजे. जर या तीन वर्गात विद्यार्थी चांगले गुण मिळवले आणि ते वर्गात नियमीत असतील तर त्यांना याचा फायदा १२ वीच्या निकालामध्ये मिळाला पहिजे. एनसीईआरटीचे यूनिट परखने याबद्दलची शिफारस केली आहे. परखची स्थापना मागिल वर्षी करण्यात आली होती.

परखच्या रिपोर्टमध्ये शिफारस करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांच्या ९वी, १० वी आणि ११ वीच्या वर्गातील कामगिरीच्या आधारावर त्यांचा १२ वीचा निकाल जाहीर केला पाहिजे. १२ वीच्या निकालात ९ वीचे १५ टक्के, १० वीचे २० टक्के आणि ११ वीचे २५ टक्के व्हेटेज देण्यात यावे असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच १२ वीच्या गुणपत्रिकेत संयुक्त मुल्यांकन फॉर्मेटिव्ह असेसमेंट (होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट) आणि समेटिव्ह असेसमेंट यांना देखील व्हेटेज असेल.

मीडिया रिपोर्टनुसार, हा रिपोर्ट शिक्षण मंत्रालय सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांसोबत चर्चेला ठेवणार आहे. जेणेकरून सर्व आपले म्हणणे मांडू शकतील, तसेच सर्वांची सहमती मिळाल्यानंतर हा रिपोर्ट लागू केला जाईल. एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या शिफारसीबद्दल मागील एक वर्षात ३२ शालेय मंडळांसोबत चर्चा करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound