भारत सर्वात खतरनाक ड्रोन एमक्यू९बी पेरडेटर अमेरिकेकडून खरेदी करणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगातील सर्वात खतरनाक ड्रोन एमक्यू ९बी पे्रडेटर, भारत असे ३१ ड्रोन अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. २५,९५५ कोटीहून अधिक रुपये खर्च करून हा भारत-अमेरिकेत होणार आहे. हे सर्व ड्रोन्स भारतातील तिन्ही सैन्य दलाला दिले जाणार आहेत. या करारासोबतच अमेरिकेने भारतासमोर एक नवीन प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार भारताला ताकदवान स्वदेशी ड्रोन बनवण्यासाठी तंत्रज्ञान सल्ला आणि मदत करणार असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. या प्रस्तावामुळे भारताला खतरनाक स्वदेशी ड्रोन बनवण्यासाठी मदत मिळणार आहे. सध्या जे ड्रोन्स अमेरिकेकडून येणार आहेत ते चार ठिकाणांवर तैनात केले जातील. चेन्नईच्या आयएनएस राजाजी, गुजरातच्या पोरबंदरमध्ये यांचे नियंत्रण भारतीय नौदल करणार आहे तर वायू सेना आणि लष्कर गोरखपूर आणि सरसावा एअरपोर्ट बेसवर याचे नियंत्रण करेल कारण याठिकाणी मोठा रनवे नाही. गोरखपूर आणि सरसावा कॅम्पमधून चीनच्या लाईन ऑफ एक्च्यूअल कंट्रोल, लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर लक्ष ठेवणे भारतासाठी सुलभ होणार आहे.

१५ ड्रोन्सच्या सहाय्याने समुद्री मार्गावरही देखरेख ठेवता येणार आहे. तर इतर ड्रोन्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर देखरेखीसाठी तैनात ठेवले जातील. अमेरिकेने या ड्रोनच्या मदतीने अल कायदाचा मुख्य अल जवाहिरी याला ठार केले होते. अमेरिका याला हंटर किलर यूएवी म्हणते. ही एक लॉन्ग रेंज एंड्यारेन्स ड्रोन आहे. जी हवेतून जमिनीवर मारा करणा-या मिसाईलने लेन्स आहे. त्यात लागलेल्या आर९एक्स हेलफायर मिसाईलने जवाहिरीच्या अड्ड्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता.

एमक्यू ९ प्रीडेटर रिमोटच्या माध्यमातून उडवले जाते. त्याला अमेरिकन कंपनी जनरल एटॉमिक्सने बनवले आहे. हा ड्रोन कुठल्याही प्रकारच्या मिशनवर पाठवला जाऊ शकतो. जसे सर्विलांस, सीक्रेट मिशन, माहिती गोळा करणे अथवा शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करणं, जास्त वेळ आणि जास्त उंचीवरून देखरेखीसाठी हा ड्रोन सक्षम आहे. या ड्रोनची रेंज १९०० किमी इतकी आहे. त्यासोबतच १७०० किलो वजनापर्यंत हे हत्यार घेऊन जाऊ शकते. याला २ कॉम्प्युटर ऑपरेटर्स ग्राऊंड स्टेशनवर बसून व्हीडीओ गेमसारखे चालवू शकतात. या ड्रोनची लांबी ३६.१ फूट इतकी आहे. या ड्रोनचे विंगस्पॅन ६५.७ फूट आणि उंची १२.६ फूट एवढी असून या ड्रोनचे फक्त वजन २२२३ किलो इतके आहे.

या ड्रोनमधून १८०० किलो इंधनाची क्षमता आहे. त्याचा वेग ४८२ किमी प्रति तास एवढा आहे. जवळपास ५० हजार फूट उंचीवरून शत्रूला पाहून त्याच्यावर मिसाईल हल्ला करण्याची ताकद या ड्रोनमध्ये आहे. सामान्यत: २५ हजार फूट उंचीवर हे ड्रोन उडवले जाते. एमक्यू ९ प्रीडेटरमध्ये शस्त्र म्हणून मिसाईल लावले जातात. त्यात ७ हार्ड पाँईट असतात. या ड्रोनमध्ये ४ एजीएम ११४ हेलफायर मिसाईल लावलेल्या असतात. ज्या हवेतून जमिनीवर टार्गेट ठेवून हल्ला करू शकतात. त्याशिवाय २ लेजर गाइडेड जीबीयू १२ पेव्हवेव २ बॉम्बही असतात. या दोघां व्यतिरिक्त या ड्रोनवर वेगवेगळ्या हत्यारांचा वापरही होऊ शकतो. सर्व मिसाईल आणि बॉम्बचा उपयोग आवश्यकतेनुसार केला जाऊ शकतो.

Protected Content