उत्तर प्रदेशात आंदोलनांना हिंसक वळण; 16 जणांचा मृत्यू, 263 जखमी

Crime news1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरूवात करण्यात आले आहे. शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले असून यात कानपूरमध्ये जमावाने एक पोलीस चोकी पेटवून दिली. त्यामुळे काही तास रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होती.

उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही हल्ले झाले. यामध्ये 263 पोलीस जखमी झाले आहेत तर 57 पोलील गोळ्या लागून जखमी झाले आहेत. यादरम्यान 705 लोकांना अटक करण्यात आली आहे तर चार हजार 500 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांनी कानपूरमधील यतीमखाना पोलीस चौकीला पेटवले. याचवेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यामध्ये पोलिसांसह अनेक सामान्य नागरिकही जखमी झाले आहेत. जमाव पांगवण्यासाठी आम्हाला लाठीचार्ज करावा लागला, तसेच अश्रुधूराचा वापर करावा लागला.

पश्चिम बंगालमध्ये रॅली
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल पुन्हा एकदा कोलकात्यात मोठी रॅली काढणार आहेत. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निगराणीखाली जनमत जमवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हानही ममता बॅनर्जींनी मोदींना दिलं आहे.

विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.

महाराष्ट्रातही पडसाद
नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात सयंमाने आंदोलने झाली. मात्र काल आणि परवा (21, 20 डिसेंबर) अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी हिंगोलीपासून हिंसक आंदोलनांना सुरुवात झाली. सकाळी जमावाने हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात बसची तोडफोड केली. या हिंसक आंदोलनाचे लोण बीड आणि परभणीतही पोहचले आहे.

Protected Content