Home Cities यावल किनगाव येथील नवनियुक्त सरपंच भारती पाटील यांचा मराठा सेवा संघांतर्फे सत्कार

किनगाव येथील नवनियुक्त सरपंच भारती पाटील यांचा मराठा सेवा संघांतर्फे सत्कार

0
48


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील नवनियुक्त सरपंच भारती प्रशांत पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष तथा ग.स. सोसायटीचे तज्ञ संचालक शिवश्री राम पवार, स्वयंदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन सोनवणे आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे प्रकल्प संचालक तसेच स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) राहणार डांभुर्णी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सरपंच भारती प्रशांत पाटील गावातील शैक्षणिक गुणवत्ता विकसन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजे या महात्मा गांधीच्या विचारांनुसार आपण कार्य कराल आणि रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध करून देण्याचा देखिल प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करत आणि सौ.भारतीताईच्या कार्यकाळात किनगावच्या विकासाला चालना मिळेल हया शुभेच्छा दिल्यात.


Protected Content

Play sound