जागतिक व्याघ्र दिन जलजागृती रॅलीची सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक व्याघ्र दिन जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्क्षतेखाली , कार्याध्यक्ष डॉ माहेश्र्वर रेड्डी पोलीस अधिक्षक तथा अध्यक्ष जिल्हा व्याघ्र समिती, जमीर शेख उप वनसंरक्षक यावल, यांच्या मार्गदर्शनात शारदा श्रम विद्यालय शिव कॉलनी जळगाव येथून जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे , केशव स्मृती प्रतिष्ठान चे भरतदादा अमळकर , समर्पण संस्थेचे संजय भावसार ,वन्यजीव संरक्षण संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन चे वीरेंद्र छाजेर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला,

वनविभाग यावल, वनविभाग जळगाव आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती कार्यक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. या जनजागृती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण यावल वनविभागा तर्फे उपलब्ध करून दिलेले मानवी वाघ यांच्या सोबत सेल्फी कॉर्नर हे प्रमुख आकर्षण आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीस भरत दादा अमळकर यांनी संस्थेच्या कार्याची भूमिका विशद केली. यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी यावल वनक्षेत्राचे महत्व स्पष्ट केले, वन विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली, पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन लोक सहभाग कसा वाढवता येईल या बद्दल त्यांनी भूमिका मांडली. पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत या प्रकारचे जनजागृती कार्यक्रम होत राहिले पाहिजे आमचे त्याला पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगत त्यांचे अनुभव कथन केले.

शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी आपल्या भाषणात वने, वन्यजीव आणि माणूस या बद्दल भूमिका मांडली माणसा पेक्षा वाघ सर्व बाबिने कसा श्रेष्ठ आहे हे सांगत असताना त्यांनी वाघाचे पोट भरलेले असताना भक्ष समोर असताना देखील तो कधीही शिकार करत नाही परंतु माणूस मात्र अति हव्यास करतो वन संपत्ती ओरबाडतो हे थांबणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले, केशव स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत दादा अमळकर यांनी वने आणि पर्यावरण या बद्दल महत्व पटवून दिले वनांचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. मान्य वरांच्या हस्ते रॅलीत सहभागी संस्थांचा गौरव करण्यात आला यात ठाण्याची जोबोहम चॅरिटेबल ट्रस्ट , वाशिम येथील कोब्रा अडव्हेंचर फाउंडेशन, गुजरात येथील डब्ल्युसीबी रिसर्च फाउंडेशन, उत्तर प्रदेश येथील रामराजी जानकी स्वयंसेवक संघ, स्कायनेट, समर्पण संस्था, दिशा फांडेशन, उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन, वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव, गजानन महाराज भक्त परिवार , नाम संस्कार फाउंडेशन, यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण देवरे यांनी केले आभार योगेश गालफाडे यांनी मानले. दिशा फाउंडेशन पथनाट्य पथकाने पथनाट्य सादर करत उपस्थितांचे मने जिंकली, मान्यवरांनी हिरवी झेडी दाखवून रॅली ला सुरवात करण्या पूर्वी वाहन चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या लक्षात येताच त्यांनी झेंडा दाखवण्यास नकार दिला नियमा नुसार प्रत्येकाला हेल्मेट घालावेच लागेल नियम तर आहेच त्याच बरोबर तुमचा जीव देखील तितकाच महत्वाचा आहे असे सांगत त्यांनी आयोजकांना या बद्दल दखल घेण्यास सांगितले भरत दादा अमळकर यांनी याची दखल घेतली केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे तात्काळ हेल्मेट उपलब्ध करून देण्यात आले आणि रॅली मार्गस्थ झाली.

संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे , स्कायनेट चे उदय पाटील, शिवराज पाटील, संजीव सटाले, दिशा फाउंडेशन चे विनोद ढगे, लघुउद्योग भारती चे सचिन अमळकर, समीर साने, संस्था पदाधिकारी तसेच १५० व्याघ्र दुतांच्या सहभागाने साजरा होत आहे. वाघ वाचवाच्या घोषणा देत जनजागृती करण्यात येत आहे. वन्यजीव संरक्षण संस्था, आणि वनविभाग यावल , जळगांव यांच्या सैयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली संपन्न होत आहे,

वाघांच्या संरक्षणासाठी आयोजित जनजागृती रॅलीत नासिक, नंदुरबार, वाशिम, ठाणे, मुंबई, रायगड, अकोला, वर्धा, तर गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून देखील व्याघ्र दुत सहभागी झाले आहेत. वाघ वाचवा जंगल वाचवा, घोषणा देत २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल वनक्षेत्र परिसरातील गावा गावात उप वनसंरक्षक वनविभाग यावल श्री जमीर शेख यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, समस्त वनकर्मचारी यांच्या सहकार्याने जनजागृती करण्यात येणार आहे

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, संस्था अध्यक्ष रवींद्र फालक , बाळकृष्ण देवरे योगेश गालफाडे , राजेश सोनवणे, मुकेश सोनार, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, संदीप झोपे, प्रदीप शेळके, वासुदेव वाढे, निलेश ढाके, सप्नील महाजन, सतीश कांबळे, विजय रायपुरे, स्कायलेब डिसुझा, भरत शिरसाठ स्कायनेट चे उदय पाटील, शिवराज पाटील , संजीव सटाले , रॅली दरम्यान मानव वन्यजीव संघर्ष व बचाव यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. २९ जुलै रोजी रावेर पाल व परिसरातील गावांमधे पथनाट्य सादरीकरण, मानवी वाघ, माहिती पत्रक वितरण करत वाघ वाचवा जंगलचाव आणि उपाययोजना, तसेच सर्पदंश माहिती आणि प्रथमोपचार या बद्दल माहिती असलेले पत्रक यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या तर्फे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे असे निमंत्रक जमीर शेख यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यलाचिव योगेश गालफाडे यांनी केले आहे.

Protected Content