मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज २३ जुलै महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांसदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. याचवेळी ६ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ते निर्णय पुढीलप्रमाणे आहे.
१. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्यात येणार. मेंढपाळ लाभार्थ्यांना आता रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार.
२. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाखांची मदत आणि अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची राज्य सरकारकडून मदत देण्यात येणार.
३. शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
४. दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आता आरक्षण धोरण राबविण्याचा निर्णय.
५. बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर देण्याचा निर्णय.
६. अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी १६ हेक्टर शासकीय जमीन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.