Home Cities जामनेर जामनेर येथे कुपोषित बालकांना औषधी वाटप

जामनेर येथे कुपोषित बालकांना औषधी वाटप


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडी तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यात कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार व आवश्यक औषधी देऊन उपचार करण्यात आले यामध्ये सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोगतज्ञांकडून तालुका स्तरावर तपासणी व उपचार करण्यात आले. या बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधी साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, आरोग्य विभाग व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने दाते शोधून सदर बालकांना औषधी वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोठारी उद्योग समुहाच्या ममता कोठारी उपस्तीत होत्या. कार्यक्रम प्रसंगी डॉ.मोना महाजन यांनी कुपोषित बालकांना आहाराचे महत्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सुर्यवंशी,प्रास्ताविक डॉ.चंद्रमणी सुरवाडे तर आभार डॉ. विजया पाटील यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी संघमित्रा सोनार, शीला पाटील, पर्यवेक्षिका रत्ना चौधरी, निशा तेली, डॉ.जयश्री पाटील, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.श्रुती महाजन, डॉ.सीमा पाटील, डॉ.मोनाली महाजन, डॉ.मनीषा पाटील, डॉ.धनंजय पाटील, डॉ.जितेंद्र वानखेडे, परमेश्वर पवार उपस्थित होते. डॉ.विजया पाटील व डॉ.धनंजय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound