Home प्रशासन यावल-भुसावळ रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमध्ये साचलेले पाणी अपघाताला देते आमंत्रण

यावल-भुसावळ रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमध्ये साचलेले पाणी अपघाताला देते आमंत्रण


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर मध्यभागी निर्माण झालेले व अपघाताला आमंत्रण देणारे जिवेघेणे खड्डयांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन, यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न वाहनधारकांमध्ये उपस्थित होत आहे . यावल शहरातील भुसावळ टी पॉईट जवळ भुसावळ मार्गावरील मुख्य रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासुन एका मॉल समोर आणी याच सस्त्यावर काही अंतरावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रवेशव्दारा समोर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे निर्माण झालीआहे.

यावल ते भुसावळकडे जाणारा हा राज्य मार्ग असुन या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते ,दरम्यान या खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वारंवार अनेक वेळा दुचाकी वाहनांचे अपघात होत आहे. अनेकांना अपघातामुळे मिळालेल्या दुखापतीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारक आणि नागरीकांच्या वतीने अनेक वेळा यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी हे या अतिश्य गंभीर अशा विषयाकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसुन येत आहे . तरी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांना दुरूस्त करण्यासाठी पाऊल उचलावी अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Protected Content

Play sound