मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुरतहून आपल्या घरून पळून आलेल्या चार अल्पवयीन मुलींना मुक्ताईनगर पोलिसांनी सुखरूपपणे थांबविले असून त्यांच्या पालकांना पाचारण करण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सुरत येथील रहिवासी असलेल्या चार अल्पवयीन मुली आपल्या घरून निघून आल्या होत्या. या मुली मुक्ताईनगरातील जय भवानी मेस येथे काल रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास भोजनासाठी आल्या. याप्रसंगी मेस चालक आकाश लिधोरे यांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ या ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठविले.
पोलिसांनी या मुलींची चौकशी केली असता त्यांनी घरून पळून आल्याचे सांगितले. या मुली सुरतमधील पांडसरा परिसरातील रहिवासी असून त्यांनी पालकांसोबतच्या वादातून घर सोडल्याचे सांगितले. मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीने तेथील पोलीस स्थानकाच्या माध्यमातून या मुलीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना या प्रकारची माहिती दिली. तेथील पथकाच्याच्या ताब्यात या मुलींना देण्यात आले असून त्यांची महिला पोलीस कर्मचारी प्रज्ञा इंगळे यांनी सर्व प्रकारची काळजी घेतली.
दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक खनके, हवालदार लिलाधर भोई, प्रदीप इंगळे, सुरेश पाटील, सागर सावे, डिगंबर कोळी, चेतन महाजन, निखील नारखेडे आणि महिला पोलीस प्रज्ञा इंगळे यांच्या पथकाने केली.