Home क्राईम लोकल पकडताना रेल्वे रूळावर पडल्याने महिलेने दोन्ही पाय गमावले

लोकल पकडताना रेल्वे रूळावर पडल्याने महिलेने दोन्ही पाय गमावले


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे. यामुळं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळे एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.


Protected Content

Play sound