अर्थमंत्री संसदेत ‘या’ दिवशी अर्थसंकल्प सादर करणार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. शनिवार, 6 जुलै रोजी ही माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्याला राष्ट्रपतींकडून मंजुरीही मिळाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी लोकसभेत सादर होणार आहे.

1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करून स्वत:साठी एक विक्रम करणार आहेत. सलग ७ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. या बाबतीत त्या माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना मागे टाकतील, ज्यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

Protected Content