Home क्राईम इन्स्टाग्रामवर फोटो टाकून तरूणीची बदनामी

इन्स्टाग्रामवर फोटो टाकून तरूणीची बदनामी

0
51

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गणेश कॉलनीतील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणीचा इन्स्टाग्रामवर फोटो टाकून बदनामी केल्याची धक्कादायक प्रकार बुधवार ३ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. नदिम शेख रा. पटेल कॉलनी, भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील गणेश कॉलनीतील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. पिडीत तरूणीसोबत असलेला फोटो संशयित आरोपी नदीम शेख रा. पटेल नगर, भुसावळ याने त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठविला. हा प्रकार बुधवार ३ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता घडल्याची माहिती पिडीत तरूणीच्या लक्षात आले. पिडीत तरूणीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नदीम शेख रा. पटेल नगर, भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound