यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल तालुका वकील संघाची वार्षीक बैठक संपन्न होवुन यात वकील संघाची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन, यात संघाच्या अध्यक्षपदी नितिन एम.चौधरी यांची तर सचिवपदी आकाश अप्पासाहेब चौधरी यांची व ग्रंथपालपदी शेखर सुजात तडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावल येथे तालुका वकील संघाची वार्षीक बैठक संघाचे तत्कालीन अध्यक्ष एस. आर. लोंढे यांच्यासह माजी सचिव याकुब तडवी यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. वकील संघाच्या या संपन्न झालेल्या या वार्षीक बैठकीस एस जी कवडीवाले, आर पी गडे, जि एम बारी, अजय कुलकर्णी, खालिद शेख, किशोर सोनवणे, अशोक आर सुरळकर, उमेश बडगुजर, निवृती पाटील, के डी पाटील, एसएस कुलकर्णी, मोहीत शेख, धिरज चौधरी, निलेश मोरे, देवेंद्र बाविस्कर, दत्तात्रय सावकारे, रितेष बारी, विनोद परतणे, गौरव पाटील, देवकान्त पाटील, फैजल शेख, सुलतांना तडवी, स्मिता कवडीवाले, मोनिका सावकारे, हेमांगी चौधरी, डिम्पल सूरळकर यांच्या सर्व वकील संघाच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न होवुन वकील संघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी नितिन चौधरी व सचिवपदी आकाश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी उपस्थितांच्या वतीने नुतन कार्यकारणीच्या पदाधिकारी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.