


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निसर्डी शिवारातील शेतात एकाचा रस्ता अडवून शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना २८ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २ जुलै रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद हिम्मतराव पाटील वय-४२, रा. निसर्डी ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती आणि व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात २८ जून रोजी सकाळी ८ वाजता ते निसर्डी शिवारातील शेतात जात असताना चुनीलाल गंगाराम पाटील रा. निसर्डी ता.अमळनेर यांनी रस्ता अडवून विनोद पाटील याला अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी विनोद पाटील याने मंगळवार २ जुलै रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चुनीलाल गंगाराम पाटील यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहे.



