राहुल गांधी पंढरपूर वारीत येणार; शरद पवारांनी दिले निमंत्रण

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत.

सर्वसामान्य वारकऱ्याप्रमाणे राहुल गांधी वारीत चालतील, असे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे. दरम्यान संजय जगताप पुढे बोलताना म्हणाले की, वारीच्या सोहळ्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर वारीत सहभागी व्हा. वारीच्या सोहळ्यात काय त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, असे म्हणत राहुल गांधी यांना वारीत सहभागी होऊ न देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर ही संजय जगताप यांनी उत्तर दिले आहे.

Protected Content