दहावी-बारावीच्या पुरवणी परिक्षा १६ जुलैपासून सुरू होणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र गुरुवारी 4 जुलैपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मुद्रित करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्राची मुद्रित प्रत देण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क न घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content