अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषि पिक विमा काढण्यासाठी यंदाही सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृउबा सभापती अशोक पाटील यांनी केले आहे.
सद्यस्थितीत शासनाची कृषि पिकांसाठी १ रुपयात पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेमार्फत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवणे सुलभ व्हावे, यासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मागील वर्षी मंत्री ना.अनिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. सदर केंद्रावर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवण्या कामी योजनेचा लाभ घेतला होता. यंदाच्या वर्षी ही अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पिक विमा उतरवण्यासाठी मोफत सुविधा केंद्र सन २०२४-२५ च्या खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा सुविधा केंद्र निशुल्क दरात १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आले आहे. सदर केंद्राचा शुभारंभ सभापती अशोक पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आला. यावेळी कृ.उ.बा.संचालक यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिक विमा काढण्यासाठी पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधारकार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, स्वयंम घोषणा पत्र, सामायिक क्षेत्र असल्यास १०० रुपयांच्या स्टॅम्पवर संमती पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.पिक विमा काढण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत आहे.तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील उपसभापती सुरेश पिरन पाटील, संचालक खा. स्मिताताई वाघ, सुभाष पाटील डॉ.अशोक पाटील, डॉ. अनिल शिंदे, भोजमल पाटील, समाधान धनगर, सचिन पाटील, नितीन पाटील, प्रफ्फुल पाटील, हिरालाल पाटील, पुष्पा पाटील, सुषमा देसले, भाईदास भिल, प्रकाश अमृतकार, वृषभ पारेख, शरद पाटील आदि संचालकांनी केले आहे.