डॉक्टर्स डे निमित्त रिस्टंड मेडिकल प्रॅक्टिसेस असो. व आय.एम.आय शाखेतर्फे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १ जुलै डॉक्टर डेनिमित्त शहर रिस्टंड मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन व आय एम एस शाखा तर्फे ईदासिनी माता देवी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

जामनेर शहर प्रॅक्टिस असोसिएशन व आय एम आय शाखेतर्फे डॉक्टर्स डे निमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचबरोबर ईधासिनी माता मंदिर परिसरामध्ये विविध जातीच्या 51 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले असून ही 51 झाडे डॉक्टर अमोल शेठ यांनी दिली आहे येणाऱ्या काळात संघटनेतर्फे जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून तालुका हिरवगार करण्याचा मानस असून विविध आरोग्य शिबीर घेऊन नागरिकांना सेवा देण्याचंकाम करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शहर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी दिली.

यावेळी आय. एम. आय. शाखेचे तालुकाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, डॉ. अमोल शेठ, डॉ. विनय सोनवणे डॉ. आर के पाटील, डॉक्टर हर्षल चांदा, डॉक्टर संजीव पाटील, डॉक्टर दीपक ठाकूर, डॉक्टर जयंत महाजन, डॉक्टर विनोद भोई, डॉक्टर निलेश काळे, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर रमेश पाटील, डॉक्टर प्रशांत महाजन, डॉक्टर निलेश चव्हाण, डॉक्टर राजेश नाईक, डॉक्टर आशिष वाघ, डॉक्टर अजय पाटील, डॉक्टर सचिन बसेर, डॉक्टर बाळकृष्ण कासट यांच्यासह जामनेर शहर डॉक्टर असोसिएशन व आय एम आय शाखेचे डॉक्टर पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ते

Protected Content