मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटातर्फे डॉक्टर्स-डे साजरा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील हे पावसाळी अधिवेशन कामकाजासाठी मुंबई येथे असल्याने त्यांच्या सूचनेनुसार सोमवार 1 जुलै 2024 रोजी डॉक्टर्स डे निमित्त मुक्ताईनगर शहरातील जनतेला अविरत सेवा देणारे डॉक्टर्स यांचा शाल व पुष्पगुच्छ तसेच प्रभू श्रीराम यांची प्रतिमा भेट देऊन शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील, शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्कप्रमुख संजनाताई पाटील, जिल्हा संघटक कल्पना पालवे, कीर्तनकार दुर्गाताई संतोष मराठे, वैशालीताई बाविस्कर, अनिता बावस्कर यांच्यासह शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद,शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुकाप्रमुख जितेंद्र उर्फ गोलू मुऱ्हे, युवा सेना उप तालुका प्रमुख मितेश पाटील, नगरसेवक डॉ. प्रदीप पाटील,निलेश शिरसाट, पियुष मोरे, युनूस खान, संतोष माळी, गणेश पाटील, स्वप्नील श्रीखंडे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Protected Content