Home Cities जळगाव ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या महानगराध्यक्षपही परेश बर्‍हाटे

‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या महानगराध्यक्षपही परेश बर्‍हाटे

0
46

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्रकारांच्या हितसंरक्षणासाठी आणि पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष म्हणून युवा पत्रकार परेश सुरेखा प्रमोद बर्‍हाटे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.

व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या संमतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांनी ही निवड जाहीर केली.

या नियुक्ती बद्दल परेश बर्‍हाटे यांचे माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील, माजी महापौर जयश्री महाजन,व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, समन्वयक विवेक ठाकरे, विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, संघटनेच्या उर्दू विंग्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, शासनमान्य अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नवाल, छगनसिंग पाटील, मनोज मानकरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे आदींनी स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound