यावल( प्रतिनिधी) भुसावळ शहरातील दुरुस्तीकरीता बंद करण्यात आलेला रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची वेळ आणि अतिरिक्त भाडेवाढचा भुर्दंड वाचला आहे.
यावल. रावेर आणि चोपडा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस भुसावळ शहरातील जुना सातारा रेल्वे पुल ते गवळीवाडा या मार्गावर धावत असतात. मात्र निकृष्ठ काँक्रीटकरणाने पाच महीन्याच्या आतच हा रस्ता खराब झाला होता. हा रस्ता खराब झाल्याने भुसावळ नगर परिषदच्या माध्यमातुन मार्ग दुरुस्तीचे काम १ महीन्यापासुन सुरू होते. रस्त्याची दुरुस्ती सुरु असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यारस्ता दुरूस्तीच्या कामामुळे यावल, चोपडा, रावेर जाणाऱ्या प्रवाशांचा ५ किलोमिटरचा बस फेरा वाढला होता. यामुळे अधिक वेळ आणि अतिरिक्त भाडे प्रवाशांना मोजावे लागत होते. यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्युज’च्या माध्यमातुन प्रवाशांच्या अडचणी आणि समस्या संदर्भात वृत प्रसिद्ध करण्यात आले होते. याची वृत्ताची तात्काळ भुसावळ नगर परिषद आणि भुसावळ एसटी महामंडळने प्रयत्न करून पुन्हा शहरातील जुन्या मार्गावर एसटी बस सेवा पूर्ववत करण्यात आल्याने प्रवाशांचे वेळ आणि अतिरिक्त भाडे आकारणी थांबल्यांने प्रवाशी बांधवांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे आभार मानले आहे