हिंगणे सबस्टेशनच्या उच्चदाब वाहिनीच्या निकृष्ट काम

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर महावितरण विभागा अंतर्गत कर्की, दुई या सबस्टेशनच्या निकृष्ट कामांच्या पाठोपाठ हिंगणे या सबस्टेशनवर बोदवड १३२kv येथून अति उच्चदाब ३३ kv विद्युत पुरवठा करण्याकरिता आज रोजी उभारण्यात येत असलेले सबस्टेशन, व विद्युत वाहिनीच्या कामात अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन अतिशय दर्जाहीन व निकृष्ट पध्दतीने सुरू असून सदर कामात महावितरणच्या अधिकाऱ्यांची आर्थिक भागीदारी असल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

सदर विद्युत खांबावर वापरण्यात येणारा कंडक्टर हा १०० स्क्वेअर एमएम चा वापरणे अंदाजपत्रकानुसार बंधनकारक असताना सदर ठेकेदाराने ०.५५ स्क्वेअर एमएम चा कंडक्टर वापरलेला आहे.वापरण्यात येणारे जीआय तार हे सुद्धा अत्यंत निकृष्ट व हलक्या प्रतीचे वापरण्यात येत आहेत.सदर विद्युत वाहिनीच्या कामासाठी वापरण्यात येणारे पोल लांबी व रुंदी ला जरी बरोबर असली तरी हलक्या प्रतीचे वजनाला कमी असे वापरण्यात येत आहेत. अंदाज पत्रकानुसार सदर विद्युत खांबांना कलरिंग करण्यात येत नसून सदर काम काम प्रगतीपथावर असतानाच जंगलेले आहेत.विद्युत वाहिनीचे खांब उभे करताना अंदाजपत्रकानुसार खोदकाम करण्यात येत नसून काँक्रीटही वरच्यावर थातूरमातूर पद्धतीने करण्यात येत आहे परंतु वरिष्ठांना दाखवण्यासाठी फोटोसेशन करण्यासाठी ठराविकच ठिकाणी वरच्यावरच काँक्रीटचे मफिंग करण्यात येत आहे.

प्रत्येक विद्युत खांब उभा करताना प्रत्येक खांबांमध्ये अंदाजपत्रक विशिष्ट अंतर बंधनकारक आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या विद्युत खांबांमध्ये वेगवेगळे अंतर मोजल्यानंतर दिसून येत आहे.तसेच हिंगणे इथे सुरू असलेले सबस्टेशनचे काँक्रीटचे काम सुद्धा अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन आहे. त्यामुळे शासनाचा शेतकऱ्यांप्रती मुबलक वीजपुरवठा पुरविण्याचा असलेला प्रामाणिक मानस महावितरणच्या भ्रष्ट अधिकार्यांमुळे भविष्यात डावलला जाऊ शकतो म्हणून अशा या महावितरणच्या मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्या आर्थिक हितसंबंधा पोटी डोळेझाक पणे ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाही गुणवत्ता ढासळलेल्या कामाला आर्थिक पाठबळ असून सदर निकृष्ट काम हे अंदाजपत्रकानुसार पूर्वत करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे

Protected Content