![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/advt-3.jpg)
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा गावातील ग्रामपंचायतीजवळ काहीही कारण नसतांना दोन जणांनी तरूणाला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २३ जून रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/Half-Page-1.jpg)
जळगाव तालुक्यातील नांद्रा गावात सिध्दार्थ जगन सोनवणे वय १९ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान, रविवारी २३ जून रोजी दुपारी २ वाजता गावातील ग्रामपंचायतीजवळ सिध्दार्थ हा उभा होता. त्यावेळी गावातील योगेश पिंटू सोनवणे आणि तेजस (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. नांद्रा यांनी सिध्दार्थ जवळ येवून काहीही कारण नसतांना हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच दोघांनी सिध्दार्थला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रविवारी २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील हे करीत आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/second-advt-ap.jpg)