अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील न्यायालयाच्या आवारातून एका वकिलाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र त्रंबक सोनवणे वय 52 रा. कुंभार टेक ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून अमळनेर येथील न्यायालयात ते वकिलीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी १२ जून रोजी सकाळी १० वाजता ते दुचाकी एमएच 19 सीबी 4813 ने न्यायालयाच्या आवारात आले होते. त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या आवारामध्ये त्यांची दुचाकी पार्किंगला लावली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुपारी ३ वाजता दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे रविंद्र सोनवणे यांनी दुचाकीचा शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रात्री ८ वाजता अमळनेर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहे.