सिलिंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण भाजले

सांगली-वृत्तसेवा | सिलिंडर गळतीमुळे आगीचा भडका उडून सांगली जिल्हयातील अक्कतंगेरहाळ (ता. गोकाक) येथील अशोक निर्वाणी यांच्या घरातील नऊ महिन्याच्या बालकासह सात भाजले गेले. यात तिघे गंभीर असून, त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर चौघांना ५ ते २० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर अन्य ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत अंकलगी पोलिसांनी सांगितले की, अक्कतंगेरहाळ गावाजवळ शेतवाडीत निर्वाणी यांचे घर असून, शनिवारी (ता. १६) रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास घरातील गॅसला गळती लागून वास सुटला.

सोमनगौडा यांनी वास कशाचा येतो पाहण्यासाठी मोबाईलचा लाईट लावला असता अचानक मोठा स्फोट झाला. यात घरावरील कौले उडून गेली व आग लागली. यात अशोक निर्वाणी (वय ४५) यांच्यासह राजेश्री (वय ४२), सोमनगौडा (वय ४२), दीपा (वय ४२), नवीन (वय १४), विद्या (वय १३) व बालक बसवनगौडा (वय ९ महिने) हे भाजले गेले. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी उठून जखमींना अक्कतंगेरहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

Protected Content